स्वरांजलि

in #musiclessons6 years ago


अंदाजे २०वर्षांपुर्वी औरंगाबादला देव बुवांच्या दोन शिबिरात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले .<o:p></o:p>

दोन /तीन दिवसांचे हे शिबिर असायचे .त्या मध्ये प्रथमतः सर्व शिबिरार्थीची गाण्याद्वारे  ओळख असायची .प्रत्येकाने स्टेज वर जाऊन आपले नाव , कुणाकडे शिकता वगैरे जुजबी गोष्टी सांगुन एखाद्या गाण्याच्या 4-5ओळी गायच्या असत .<o:p></o:p>

प्रत्येकाने गायले की त्यावर देव बुवा अतिशय मार्मिकपणे , नेटके आणि मुद्देसूद टिप्पणी करत .अगदी योग्य पट्टी पासुन अक्षरशः प्रत्येक शब्दाचा अर्थ , त्या शब्दाचा योग्य उच्चार , योग्य उच्चारासाठी लागणारी तयारी , त्या दृष्टीने करावयाचा रियाज या आणि अश्या अनेक गोष्टींचा शिबिरात समावेश असे . सर्वसमावेशक अशी त्यांची शिबिरे होत .त्यात अजुन एक म्हणजे देव बुवा , शिबिरांमध्ये नामांकित कवींची , त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते देखील अतिशय बरकाव्यासकट शिकवत .त्यांच्या स्वतःच्या कविता देखील असत .<o:p></o:p>

त्यांचा थोडासा मिश्कील स्वभाव  विद्यार्थ्यांना सांगताना डोकावत असे मात्र , कुणाचीही फजिती करण्याचा त्यात हेतु नसे.<o:p></o:p>

या शिबिरांच्या आधी अहमदनगरच्या एका स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी देव बुवा आणि पं.अभिषेकी बुवा आले होते . बक्षीस वितरणानंतर ते मुद्दाम थांबले , सगळ्यांशी  उत्तम संवाद साधला , कोणाकोणाला बक्षिसे कुठल्या विभागात मिळाली आहेत ? कुठले भावगीत , कुठले नाट्यपद , कुठली गज़ल ..सगळ्या गोष्टींची वर - वर नाही तर नीट चौकशी करून अतिशय सखोल असे विश्लेषण केले . ज्यामुळे आम्हा सगळ्यांना जाणीव झाली की , आपण ज्या गाण्यावर बक्षीस मिळवले त्यात किती गोष्टी राहुन गेल्या ..<o:p></o:p>

पुढील वेळीस गीत सादर करताना  त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आचरणात आणायच्याच अशी   मनाशी खुणगाठ बांधली ! <o:p></o:p>

देव बुवांनी , गाताना बसायचे कसे , श्वासाचे  उत्तम नियोजन , श्वासाचे  सहजपणे साकारण्याचे तंत्र , गाण्याचा अर्थ समजुन घेण्याची क्रिया तसेच समजलेले गीत मांडण्याची क्रिया , कवीचा - संगीतकाराचा दृष्टिकोन , ध्वनीक्षेपक वापरण्याचे तंत्र , या आणि अश्या अनेक गोष्टींसोबत त्यांचे उत्तम मार्गदर्शनपर भाषण ऐकणे म्हणजे मेजवानीच ! (वरील सर्व मुद्दे या खेरीज अनेक गोष्टी त्यांच्या "रियाजाचा कानमंत्र " तसेच "शब्दप्रधान गायकी "या पुस्तकांत नमूद केलेले आहेत .)<o:p></o:p>

गाणं समजाऊन सांगण्याची तळमळ , भाव व्यक्त करण्याची शिकवण , अवघड अक्षरं गाताना बाळगायची सावधगिरी , या सारख्या विषयांपासुन ते गाताना मुख/तोंड कसे असावे , आकारात गाताना किती 'आ' असावा या बाबी पण ते सप्रयोग स्पष्ट करायचे .<o:p></o:p>

काय -किती गोष्टी शिकायला मिळाल्या हे मांडता येणंच कठीण ! <o:p></o:p>

शिबिराव्यतिरिक्त त्यांनी मला ते जिथे निवासाला होते तिथे बोलवले होते ,मी व माझी आई त्यांना भेटायला गेलो असता (माझ्या मावशीची त्यांची ओळख ) गप्पा झाल्यावर माझ्याकडुन एक -एक गाणे म्हणुन घेऊन , त्यातले सुक्ष्म निरीक्षण करून बारकावे मला सोप्या शब्दात उलगडून सांगितले ते ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात .. .. ..<o:p></o:p>

मला जर गाण्यासाठी , त्यातील भाव व्यक्त करण्यासाठी दाद मिळाली तर त्याचे संपूर्ण श्रेय मी देव बुवांना देते 🙏🏻🙏🏻<o:p></o:p>

त्यांनी अतिशय उत्तम दृष्टिकोन बहाल केला आहे , मी काही त्यांच्याकडे कायम स्वरूपी शिकले नाही , त्यानंतर मला त्यांना भेटता देखील आले नाही , पण त्या -त्या वेळी त्यांनी जी मोलाची शिकवण दिली ती कायम आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न राहील !<o:p></o:p>

<o:p> </o:p>

💐🙏🏻🙏🏻💐<o:p></o:p>

सौ .नीलिमा भागवत<o:p></o:p>

<o:p> </o:p>

Neelima Maam photo<o:p></o:p>



Posted from my blog with SteemPress : https://muziclub.com/2018/11/06/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%bf/

Sort:  

This user is on the @buildawhale blacklist for one or more of the following reasons:

  • Spam
  • Plagiarism
  • Scam or Fraud
  • Low quality content